खोल खोल दुष्काळ डोळे
By Pradeep Kokre
₹359.00₹299.00
खोल खोल दुष्काळ डोळे (कादंबरी)
लेखक: प्रदीप कोकरे
₹299.00
एका संवेदनशील कवी मनाच्या तरुणाचे उमेदवारीचे दिवस रेखाटणारी ही कादंबरी आहे. स्थैर्य, सुरक्षितता न गवसलेल्या आणि बुड टेकण्याच्या धडपडीतल्या दिवसांच्या या जणू नोंदी आहेत. या कादंबरीतल्या नायकाचा प्रवासही भटका आणि भणंग... 'एका झाडाची सवे न व्हावी : एका स्थानाची सवे न व्हावी' असा आहे. जगण्याच्या घुसळणीत शब्दांना सत्व बहाल करणाऱ्या तुकारामापासून ते आवाजात कारुण्य साकळलेल्या मुकुल शिवपुत्रापर्यंत अशा अनेक गोष्टी या नायकाला बळ पुरवणाऱ्या आहेत.
वेढलेली परात्मता, दुःख, स्वार्थ, प्रेम, निराशा अशा विविध प्रवृत्तींचे प्रतिबिंब इथे दिसेल. कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक, विस्कळीत वाटणाऱ्या उठाठेवी एका निर्णायक वळणावर चिंतनशीलतेचा टप्पा गाठतात आणि ठाव न गवसलेला हा प्रवासही अस्तित्वशोधाच्या बिंदूपर्यंत येऊन पोहोचतो. व्यर्थतेतही अर्थपूर्णता शोधणारी 'खोल खोल दुष्काळ डोळे' ही प्रदीप कोकरे यांची कादंबरी म्हणजे आजच्या एका पिढीचा महत्त्वाचा प्रातिनिधिक स्वर आहे.
— आसाराम लोमटे
या आवृत्तीची वैशिष्ट्ये
संवेदनशील, चिंतनशील तरुण नायकाभोवती फिरणारी कादंबरी
आजच्या पिढीचा प्रातिनिधिक स्वर मांडणारी साहित्यकृती
आसाराम लोमटे यांची प्रशंसा लाभलेली कलाकृती
लोकवाङ्मय गृह प्रकाशित
Product Specifications
तपशील | माहिती |
|---|---|
शीर्षक | खोल खोल दुष्काळ डोळे |
लेखक | प्रदीप कोकरे |
ISBN | NP-2026 |
प्रकाशक | लोकवाङ्मय गृह |
मूल्य | ₹299.00 |
Binding | [NP-2026] |
व्यर्थतेतही अर्थ शोधणाऱ्या एका पिढीचा आवाज.
Namami Prakashan
Flat No. 101 - Shubharambha Apartment , Chintamani Nagar Nagpur 440022
Direct from press to study table across every pin code in India.
Sitemap
Direct Press Support
Free Pan-India Delivery Available
Cash On Delivery Available
© 2026 All rights reserved.
