अंधारबन आणि ताळा
लेखक: शशी भगत
₹180.00₹150.00
अंधारबन आणि ताळा
हा शशी भगत यांचा कवितासंग्रह समाजस्थितीबद्दलची आस्था आणि आपुलकी व्यक्त करतो. बुद्ध-आंबेडकरांच्या विचारमार्गावर उभी असलेली ही कविता परिवर्तनाची जाणीव देते आणि समाजाला विधायकतेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करते.
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या वर्तमानाला प्रागतिक विचारांची आणि सम्यक भावनांची जोड मिळायला हवी. हीच जाणीव ‘अंधारबन आणि ताळा’ या कवितासंग्रहातून अंतःकरणपूर्वक व्यक्त झाली आहे.
कवी शशी भगत यांचे व्यक्तिमत्त्व आंबेडकरवादी मनोभूमिकेतून घडलेले आहे. समाजातील नानाविध विसंगतींकडे ते समंजसपणे पाहतात आणि त्यावर आपल्या कवितांमधून काव्यरूप भाष्य करतात. सभोवतालच्या विपरीत व विरोधाभासी समाजस्थितीवर मात करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचे विचारधन दिशादर्शक ठरू शकते, हे या संग्रहातील कविता प्रभावीपणे सांगतात.
या कविता मोठ्या बोलक्या स्वरूपाच्या आणि मूल्यगर्भ आशयाच्या आहेत. भावना, कल्पना, संवेदना आणि विचार या सर्वांचा एकजिनसी आविष्कार कवीने कुशलतेने साधला आहे. भूतकाळातील यातनाचक्राचा उभा-आडवा छेद घेताना तो वर्तमानकालीन विसंगतींचाही काव्यात्मक वेध घेतो.
या संग्रहातून कवीचे मन एका बाजूने संयत व शांत, तर दुसऱ्या बाजूने स्फोटक व बंडखोर दिसते. या दोन्ही मनोवृत्तींच्या मिलाफातून कविता समकालीन समाजजीवनातील विरोधाभास उजागर करते.
बौद्ध-आंबेडकरी जीवनदृष्टी आजच्या समाजजीवनाला न्याय देऊ शकते आणि त्याला विसंगतीमुक्त करू शकते, हे मौलिक भान हा कवितासंग्रह वाचकांना देतो.
(प्रस्तावनात्मक अभिप्राय: डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे, मराठी विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ)
पुस्तकाची माहिती (Product Details)
तपशील | माहिती |
|---|---|
शीर्षक | अंधारबन आणि ताळा |
लेखक | शशी भगत |
प्रकार | कवितासंग्रह (मराठी) |
प्रकाशक | नमामि प्रकाशन, नागपूर |
पृष्ठसंख्या | 216 |
बाइंडिंग | पेपरबॅक |
आकार | रुंदी 14 सेमी × उंची 22 सेमी |
भाषा | मराठी |
ISBN | 978-81-997650-3-0 |
Namami Prakashan
Flat No. 101 - Shubharambha Apartment , Chintamani Nagar Nagpur 440022
Direct from press to study table across every pin code in India.
Sitemap
Direct Press Support
Free Pan-India Delivery Available
Cash On Delivery Available
© 2026 All rights reserved.
