जयंती Jayanti (Marathi Book)
A literary masterpiece by Gautamiputra Karle
₹350.00₹269.00
जयंती
लेखक: गौतमीपुत्र कांबळे
₹269.00
गौतमीपुत्र कांबळे यांचे 'जयंती' हे पुस्तक म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर दहा वर्षांच्या अंतराने बदलत गेलेल्या जयंती महोत्सवाच्या स्वरूपावरील एक भेदक एक्स-रे रिपोर्ट आहे. धम्मक्रांती म्हणजे कार्ल मार्क्सपेक्षा अधिक निर्दोष असं जग बदलणारं क्रांतिकारी धम्म तत्त्वज्ञान! त्यातला आशय पुढील काळात कसा धूसर होत गेला आणि एका प्रतिक्रांतीला कसा जन्म देता झाला, यासंबंधी अत्यंत प्रामाणिक आणि तटस्थपणे या पुस्तकामधून कांबळे यांनी उपहासात्मक, मार्मिक भाष्य केले आहे.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माला विधी व परंपराग्रस्त धर्माचे रूप कसे प्राप्त होत गेले हे दाखवून दिले आहे. उजव्या व डाव्या दोन्ही स्वरूपाच्या पोथीनिष्ठ विचारांची धम्मक्रांतीशी नेत्यांनी तत्त्वहीन सांगड घातल्याने बाबासाहेबांना मानणारा समाज कसा भरकटत चालला आहे, याचे भेदक दर्शन पहिल्या चार 'जयंती'मधून लेखकाने घडवले आहे, तर पाचवी जयंती एक लोभस स्वप्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातली धम्मक्रांती आणि त्याद्वारे समताधिष्ठित समाज घडवण्याचे स्वप्न धम्मनगर या नव्याने वसवलेल्या गावात कसे साकार झाले याची रोचक कहाणी या पुस्तकात आहे.
मराठी साहित्याच्या ललित लेखनाच्या साच्या रूढ चौकटी मोडून एक नवा साहित्यप्रकार, ज्याला लेखकाने 'कथालेख' म्हटले आहे, तो गौतमीपुत्र कांबळे यांनी दिला आहे.
— लक्ष्मीकांत देशमुख (अध्यक्ष, ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदा)
या आवृत्तीची वैशिष्ट्ये
बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या स्थित्यंतरांवर परखड, तटस्थ भाष्य
'कथालेख' या नव्या साहित्यप्रकाराचा प्रयोग
धम्मक्रांतीच्या मूळ तत्त्वज्ञानाचा शोध घेणारे वाचनीय पुस्तक
लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रशंसा लाभलेली कलाकृती
एक्सप्रेस पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर प्रकाशित
Product Specifications
तपशील | माहिती |
|---|---|
शीर्षक | जयंती |
लेखक | गौतमीपुत्र कांबळे |
प्रकाशक | एक्सप्रेस पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर |
मूल्य | ₹269.00 |
Binding | [NP-2026] |
उत्सवी थाटात बाबासाहेबांचे विचार हरवत तर नाहीत ना? — एक परखड, वाचनीय भाष्य.
Namami Prakashan
Flat No. 101 - Shubharambha Apartment , Chintamani Nagar Nagpur 440022
Direct from press to study table across every pin code in India.
Sitemap
Direct Press Support
Free Pan-India Delivery Available
Cash On Delivery Available
© 2026 All rights reserved.
