लोकशाहीतला माणूस (Marathi Book)

By - Ashok Gopal

₹1120.00₹999.00

लोकशाहीतला माणूस

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर: जीवन आणि विचार | लेखक: अशोक गोपाळ | भाषांतर: अवधूत डोंगरे

₹[999/-]

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) हे आधुनिक भारतात आदर्शवत मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. १९३०च्या दशकापर्यंत भगवद्‌गीतेला आदरस्थानी मानून तिचा आधार घेणारे आंबेडकर कालांतराने हिंदू धर्माविरोधात का व कसे गेले? कोलंबिया विद्यापीठातील त्यांच्या शिक्षणाचा प्रभाव महाडच्या १९२७ सालच्या चवदार तळ्याच्या संघर्षावर आणि १९४०च्या दशकातील भारतीय संविधानाच्या मसुदानिर्मितीवर कसा पडला? हिंदू म्हणून मरणार नसल्याचे १९३५ साली जाहीर करणाऱ्या आंबेडकरांनी 'हिंदू कोड बिल' तयार करण्यासाठी इतकी पराकाष्ठा का केली? — अशा अनेक प्रश्नांची चिकित्सक उत्तरे देण्याचा काटेकोर प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे.

अशोक गोपाळ यांनी आंबेडकरांचे मराठी व इंग्रजी भाषांमधील लेखन, त्यांची भाषणे व पत्रे यांचे सखोल वाचन केलेच, शिवाय स्वतः आंबेडकरांनी काय वाचले असेल त्याचाही अभ्यास केला. अनेक संदर्भांची पडताळणी करून लिहिलेला हा ग्रंथ आंबेडकरांच्या जीवनचरित्रासोबतच त्यांचा वैचारिक प्रवासही चिकित्सकपणे उलगडून दाखवतो — आजवर मराठीत प्रकाशित झालेल्या सर्वांत सखोल व सर्वसमावेशक आंबेडकर चरित्रांपैकी एक.

या आवृत्तीची वैशिष्ट्ये

  • संपूर्ण, चिकित्सक व अनेक संदर्भांची पडताळणी करून लिहिलेले चरित्र

  • लेखक अशोक गोपाळ, भाषांतर अवधूत डोंगरे

  • ८४८ पृष्ठांचा सर्वसमावेशक ग्रंथ

  • हार्डकव्हर, मोठा आकार

  • आंबेडकरांचे जीवन आणि वैचारिक प्रवास एकत्र उलगडणारा दुर्मिळ ग्रंथ

  • संशोधक, विद्यार्थी व गंभीर वाचकांसाठी अत्यावश्यक संदर्भग्रंथ

Product Specifications

तपशील

माहिती

शीर्षक

लोकशाहीतला माणूस

लेखक

अशोक गोपाळ

भाषांतर

अवधूत डोंगरे

पृष्ठे

848

Binding

हार्डकव्हर, मोठा आकार

प्रकाशक

मधुश्री पब्लिकेशन

मूल्य

[999]

आंबेडकरांच्या जीवनाचा आणि विचारांचा सर्वांत सखोल शोध — प्रत्येक गंभीर वाचकासाठी.