अशोक: भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध

सम्राट अशोकाचा हरवलेला इतिहास आणि बौद्ध संस्कृतीचा संशोधनात्मक शोध — मूळ लेखक: चार्ल्स ॲलन | अनुवाद: डॉ. धनंजय चव्हाण

₹749.00₹649.00

अशोक — भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध

अशोक — भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध

मूळ लेखक: चार्ल्स ॲलन | अनुवाद: डॉ. धनंजय चव्हाण

₹650.00

चार्ल्स ॲलन हे ब्रिटिश लेखक आणि नावाजलेले इतिहासकार होते. त्यांच्या घराण्यातील पूर्वजांनी ब्रिटिशकालीन भारतात नोकरी केली होती, आणि त्यांचे बरेचसे लिखाण भारत व आशिया खंडातील देशांबाबत आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेल्या प्रिपहवा स्तूपाच्या उत्खननाचा त्यांनी पुन्हा आढावा घेतला — कारण त्यावेळी त्याबद्दल जाणीवपूर्वक संशयाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. संशोधनाद्वारे त्यांनी तेथे सापडलेले अस्थिकलश शाक्यमुनी बुद्धांचेच होते हे ठामपणे मांडले.

फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांचे 'Ashoka: the Search for India's Lost Emperor' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याचा मराठी अनुवाद डॉ. धनंजय चव्हाण यांनी केला असून हे पुस्तक 'अशोक: भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध' या नावाने २०१९ मध्ये प्रकाशित झाले.

दुसऱ्या शतकात रचलेल्या अनेक ब्राह्मणी पुराणांमध्ये बुद्धांची शिकवण व बौद्ध शासकांबद्दल वैरभाव प्रगट झालेला दिसतो. राजा नेहमीच क्षत्रिय व ब्राह्मण मंत्र्याच्या सल्ल्याने राज्य करणारा असावा, अशी नोंद पुराणांत असल्याने या अटी पाळणाऱ्या राज्यांच्याच नोंदी ठेवल्या गेल्या — आणि यातूनच भारतीय इतिहासातून अनेक शतकांचा बौद्ध इतिहास वगळण्यात आला. सम्राट अशोकाची भव्य गाथा अशा प्रकारे निःशब्द करण्यात आली. मात्र भारतभूमीवर सर्वत्र इतिहासाच्या पाऊलखुणा शिल्लक होत्या, आणि त्या ओळखून ब्रिटिश संशोधकांनी सुमारे दोन शतके अथक प्रयत्न करून भारताचा इस्लामपूर्व इतिहास शोधून काढला. या कष्टांची परिणती म्हणजे सम्राट अशोकाचा दैदिप्यमान कालखंड पुन्हा उजेडात आला — त्याचे शिलालेख, स्तंभ, स्तूप आणि लेण्यांमधील शिल्प-चित्रे पाहून त्यांच्या कारकिर्दीचा विस्मयकारक जीवनपट उभा राहतो.

या आवृत्तीची वैशिष्ट्ये

  • सम्राट अशोकाच्या हरवलेल्या इतिहासाचा सप्रमाण, संशोधनाधारित शोध

  • ब्रिटिश इतिहासकार चार्ल्स ॲलन यांचे मूळ इंग्रजी पुस्तक (२०१२), मराठी अनुवाद (२०१९)

  • शिलालेख, स्तंभ, स्तूप व पुरातत्त्वीय पुराव्यांवर आधारित मांडणी

  • बौद्ध इतिहास भारतीय इतिहासातून का वगळला गेला याचे सखोल विश्लेषण

  • इतिहासप्रेमी, संशोधक व बौद्ध अभ्यासकांसाठी अत्यावश्यक ग्रंथ

Product Specifications

तपशील

माहिती

शीर्षक

अशोक: भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध

मूळ लेखक

Charles Allen

अनुवाद

डॉ. धनंजय चव्हाण

मूळ प्रकाशन

फेब्रुवारी २०१२ (मराठी आवृत्ती: २०१९)

मूल्य

₹650.00

Binding

[NP-2026]

भारताच्या इतिहासातून पुसल्या गेलेल्या एका महान सम्राटाचा, पुराव्यानिशी घेतलेला शोध.